हाऊसकीपिंग पासून पेट्रोल पंप सहाय्यक पर्यंत : मंदाताईंचा प्रवास

By Ravindra Mahagade

Supported by Bajaj Finserv

पार्श्वभूमी :

मंदा जनार्दन येळवंते, वय 39, शिक्षण-8th राहणार- चेतना कॉलनी, नवनागापूर,एमआयडीसी, अहिल्यानगर. मंदा गेल्या एक वर्षापासून हाउसकीपिंग चे काम करत होती. मंदा या महिलेचे पती जनार्धन  हे सतत दारू पीत असल्यामुळे तसेच कुठल्याही प्रकारचे काम करत नसल्याने व शेती असूनही ती कसत नसल्याने मंदाताई ह्या त्यांच्यापासून विभक्त राहत आहेत मंदाताई यांना वीस वर्षाचा प्रीतम नावाचा मुलगा आहे. सध्या प्रीतम एका कंपनीमध्ये काम करत आहे. मंदाताई च्या घरात आई व एक मुलगा असे कुटुंब आहे. मंदाताई ज्यावेळी हाउसकीपिंग मध्ये काम करत होत्या त्यावेळी त्यांचे कुटुंबात आर्थिक प्रश्न सोडवताना मंदाताई ला खूप कसरत करावी लागत असे.

समस्या :-

मंदाताई  ही महिला सर्वप्रथम हाउसकीपिंग चे काम करत होती. येथे हाउसकीपिंग चे काम करत असताना मंदाताईला एकूण आठ हजार रुपये इतका पगार होता. या महिलेमध्ये पेट्रोल पंप क्षेत्रात काम करावे ही खूप इच्छा होती परंतु जेमतेम आठवी शिक्षण व कमी आत्मविश्वास यामुळे ही महिला पुढे येण्याची हिंमत करत नव्हती. एक दिवस पेट्रोल पंप क्षेत्रामध्ये भेट देत असताना मंदाताईशी ओळख झाली.मंदाताईचे पेट्रोल पंप क्षेत्रात काम करण्याची इच्छा पाहून सर्वप्रथम त्यांना समुपदेशन करणे खूप महत्त्वाचे होते हे लक्षात आले. मंदाताईला घरातील जबाबदाऱ्या तसेच आर्थिक प्रश्न या सर्व गोष्टींमुळे नवीन विचार करायला सुचत नव्हते. पुढे शिकण्याची इच्छा अपूर्ण राहत.

हस्तक्षेप :-

युथ ऍड फाउंडेशन, सामाजिक संस्था, प्रशिक्षण केंद्र अहिल्यानगर यांच्या माध्यमातून सर्वप्रथम मंदाताई  यांना एक दिवस वेळ काढून आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांची समुपदेशन झाले व त्यांना त्या जिथे हाउसकीपिंग चे काम करत आहेत त्याच ठिकाणी त्यांना पेट्रोल पंप सहाय्यक प्रशिक्षण देण्याचे ठरवले व अशाप्रकारे प्रशिक्षण पूर्ण करून मंदाताई आज चांगल्या प्रकारे पेट्रोल पंप सहाय्यक म्हणून काम करत आहेत.

वैयक्तिक सामाजिक बदल

मंदाताई यांचे जीवन कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मंदाताई मध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहक व्यक्ती बरोबर बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला .आपणही हे काम करू शकतो आपणही चांगल्या प्रकारे पैसे मोजून देऊ शकतो व पेट्रोल पॉईंटवर उभे राहणे. इतर कॅश हँडल करणे. या सर्व गोष्टी मंदाताई सहज करू शकतील असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला. हे सर्व जीवन कौशल्य प्रशिक्षण व आर्थिक साक्षरता, सोशल मीडियाचा वापर, संवाद कौशल्य तसेच रागावर नियंत्रण अशा विविध विषयांचा मंदाताईला काम करत असताना फायदा होऊ लागला. सध्या मंदाताई न्यू एज फ्लू पेट्रोलियम या या पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप सहाय्यक म्हणून काम करत आहेत. मंदाताई यांना महिन्याला एकूण 13 हजार रुपये इतका महिन्याला पगार जमा होतो. सुरुवातीला हाउसकीपिंग म्हणून काम करत असताना आठ हजार रुपये घेणारे महिला आज पेट्रोल पंप सहाय्यक म्हणून प्रशिक्षण घेऊन 13000 रुपये पगार घेत आहे याचं खरंच मनोमन मंदाताईला समाधान वाटते.

शाश्वत बद्दल

मंदाताई  यांच्याशी प्रत्येक महिन्याला संपर्क होत असतो.मंदाताई यांना कामाच्या ठिकाणी कुठल्या अडचणी येतात किंवा ग्राहकांबरोबर बोलत असताना कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागते. शासनाच्या विविध योजना मंदाताईला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जसे लाडकी बहीण योजना, E-श्राम कार्ड,कुटुंब कल्याण योजना, आरोग्य संदर्भातले प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, अशा विविध योजना तसेच आर्थिक गुंतवणूक या संदर्भात  वेळोवेळी मंदाताईची समुपदेशन करत आहोत तसेच मंदाताईला अजून चांगल्या प्रकारे पगार वाढ होऊन त्यांचे वैयक्तिक आयुष्य व आर्थिक सामाजिक आयुष्य सुख समाधानाचे, आरोग्यदायी कशी होईल हा प्रयत्न युथ ऍड फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करत आहोत.

Leave a Reply