आदिवासी गरोदर महिलांच्या आरोग्याच्या हिमनगाचे टोक!
महासागरात आपण हिमनग बघतो तेव्हा त्याचे एकदम छोटेस टोक दिसते पण पाण्याच्या खाली मोठा पर्वत असतो. याची प्रचिती आली जेव्हा नंदुरबारच्या २२४ आदिवासी गरोदर महिलांचा पूर्व-प्रसूतीदरम्यान घ्यायच्या काळजीचा डेटावर काम करताना. निमित्त होते “सकल समाज क्रांतीसाठी, आरोग्य पोषण अभियान” या प्रकल्पाचे. नंदुरबार जिल्यातील शहादा तालुक्यातल्या १० गावांमध्ये ‘के कॉर्प फौंडेशन’
