नारी शक्तीचा उदय

By रवींद्र माघाडे

Supported by: Bajaj Finserv

समस्या –

माया धनाजी काळोखे ही महिला तशी कामात खूप जिद्दी आणि प्रामाणिक आहे. इयत्ता पाचवी शिक्षण झालेल्या माया या महिलेला बालपणापासूनच कष्टाची खूप आवड होती. माहेरची परिस्थिती तशी जेमतेम. मायाताई चे वडील स्वतःची पिठाची गिरणी व तसेच शेती सांभाळून घर खर्च भागवत होते परंतु यामध्ये कुटुंबाला समाधानकारक ठेवण्यात त्यांना अपयश येत होते.घरात मायाताई बरोबर अजून चार भावंडे होती. दोन भाऊ दोन बहिणी अशा भावंडांमध्ये माया खूप आनंदाने मोठी होत गेली. परंतु कष्ट आणि संघर्ष प्रत्येक वेळेस मायाताई यांच्या वाटायला येत होते. ज्ञानाच्या अभावामुळे हेच दारिद्र्य परंपरागत पुढे मायाताई बरोबर चालत आले आणि शिक्षणापासून वंचित रहावे लागले. लहानपणापासून घरची परिस्थिती हालाखीच्या असल्यामुळे कमी वयातच बालकामगार म्हणून काम करावे लागले. बीड भट्टी कामगार शेतमजूर,ऊसतोड कामगार,रोडवरील वेगवेगळी कामे अशी कामे करत मायाताई करत तिच्या जीवनामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करत होत्या. 2011 मध्ये मायाताई यांचा विवाह झाला. माया ताई यांचे पतीचे शिक्षण पाचवी असल्यामुळे ते देखील वाहन चालकाचे काम करत आहेत.  एका चहाच्या कंपनीच्या जागेत राहत असून माया ताईचे पती तेथे वाहन चालक म्हणून काम करतात. वाहन चालक म्हणून कंपनीत काम करत असल्यामुळे कंपनी मालकाने त्यांना राहण्याची सुविधा करून दिली. या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तसेच महागाईच्या जीवनामध्ये मायाताईंच्या पतीला व त्यांना दोन मुले झाली या मुलांना मोठा करत असताना त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सध्या मुले शिक्षण घेत आहेत एक मुलगा पाचवीला व एक मुलगा चौथीला आहे.

हस्तक्षेप-

माया धनाजी काळोखे ही महिला सर्वप्रथम ग्राम संघाच्या सभेमध्ये उपस्थित होती या सभेच्या माध्यमातून  युथ ऍड फाउंडेशन अहिल्यानगर चे सहकारी तेथे संस्थे विषयी तसेच महिला सबलीकरण या विषयावर माहिती सांगण्यासाठी गेले होते. त्यानंतर या महिलेला आपल्या कामाबद्दल माहिती समजली व तिने लगेचच आपली नाव नोंदणी करून घेतले व पुढे येऊन जीवन कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी ही महिला तयार झाले. ही महिला फक्त प्रशिक्षण घेतले नाही तर ती पुढे येऊन तिने एका चांगल्या कामे करू लागली.

  • मायाताई यांचा कामातला असणारा प्रामाणिकपणा पाहून त्या महिलेला चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी यासाठी युथ एड फाउंडेशनचे सहकारी प्रयत्न करू लागले.
  • महिलेची वैयक्तिक तसेच कौटुंबिक समुपदेशन केले
  • महिलेच्या अडचणी समजून घेऊन वेगवेगळे प्रशिक्षण तसेच कामाचे पर्याय समोर ठेवण्याचा प्रयत्न केला.
  •  जीवन कौशल्य प्रशिक्षण देऊन आत्मविश्वास वाढवण्यामध्ये प्रयत्न केला.
  •  निरंतर पाठपुरावा करून माया महिलेला एका चांगल्या बँकेमध्ये हाउसकीपिंग या पदासाठी फाउंडेशनचे सहकारी यांनी काम मिळवून दिले.
  •  अहिल्यानगर प्रशिक्षण केंद्र येथे मायाताई यांना बोलावून त्यांचा Soft skill and   Hard Skill Certificate  देऊन सन्मान करण्यात आला.  She is place in Rajmata Multi state bank on Rs.10000 हीच प्रेरणा घेऊन ही महिला चांगल्या प्रकारे काम करत आहे.

परिणाम-

मायाताई यांनी चांगल्या प्रकारे जीवन कौशल्य प्रशिक्षण घेतल्यामुळे कामाचे ठिकाणी तसेच वैयक्तिक आयुष्य देखील समाधानी आनंदी आयुष्य जगत आहे. रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव बँक येथे हाउसकीपिंग म्हणून काम करत आहे. येथे मायाताई आपल्या कामांमध्ये खूप समाधानी आहे. या कामातून ती कुटुंबाला हातभार लावू शकते याचं त्यांना समाधान आहे. मायाताई सारखी महिला जी फक्त घरकाम किंवा शेतीकाम यापूर्वीच मर्यादित होती ती आता समाजामध्ये बाहेर पडली वेगवेगळे निर्णय घेत आहे बँकेमध्ये खाते खोलले, आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे हाताळत आहेत, जी महिला रोजंदारीवर काम करत होती ती महिला आज महिन्याचा पगार घेऊन त्यातून बचत करायला देखील शिकलेली आहे तसेच नुसतीच बचतीवर न थांबता बचत केलेले पैसे कसे गुंतवावे व आपल्या भविष्यकाळाच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी याचा वापर कसा होईल यासाठी देखील ही महिला प्रयत्न करत आहे तसेच सोशल मीडियाचा चांगला वापर करत आहे.मायाताई तिच्या जीवनात झालेल्या या बदलावामुळे तिने अजून इतर महिलांना देखील युथ एड फाउंडेशनच्या या महिला सबलीकरण च्या कार्याबद्दल माहिती देत आहे व जास्तीत जास्त महिला सबल कसे होतील यासाठी ती एक मार्गदर्शक म्हणून देखील काम करत आहे.

 शिकवण –

यूथ एड फाउंडेशन च्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या स्किलिंग प्रोग्राम चा जो उद्देश आहे की महिला सबलीकरण हा या माध्यमातून घडवून आला याचं खरंच एक मनापासून समाधान आहे. गरजू महिलांपर्यंत पोहोचून त्यांचे अडचणी समजावून घेऊन योग्य समूपदेशाने महिला सबल होऊ शकते हे या केस स्टडी मधून शिकवण्यास भेटले.अपारंपारिक उपजीविका हा विषय महिलांना चांगल्या प्रकारे समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. आणि या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध नक्कीच होतील हे देखील या विषयातून समजून येईल. कारण महिला काम करण्यासाठी इच्छुक असतात परंतु त्यांच्यामध्ये काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास ज्यावेळेस आपण महिलांमध्ये निर्माण होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने अपारंपारिक उपजीविका या माध्यमातून महिला सबलीकरण आपण अजून चांगल्या प्रकारे घडवू शकतो असे मला वाटते.

Leave a Reply