By Ravindar Mahagade
Supported by Bajaj FinServ (NTL)
प्रज्ञा आकाश साबळे, वय-29, शिक्षण-12 ही महिला तपोवन रोड येथील बचत गटाच्या माध्यमातून युथ एड फाउंडेशन सामाजिक संस्थेची जोडल्या गेली. प्रज्ञा ही पहिल्यापासूनच जिद्दी आणि मेहनती होती त्यामुळे ती एका जनरल स्टोअर मध्ये काम करत होती. प्रज्ञाचे लग्न 2017 मध्ये झाली. सध्या प्रज्ञाला दोन लहान गोंडस मुली आहेत एक मुलगा व एक मुलगी असे. प्रज्ञाचे पती शिक्षण दहावी हे प्लंबिंग क्षेत्रामध्ये काम करत आहे व सासू घरकाम करते.सासरची सर्व मंडळी प्रज्ञाला खूप छान प्रकारे सहकार्य करतात. प्रज्ञाच्या माहेरी प्रज्ञाची वडील प्रज्ञा लहान असतानाच मृत पावलेले आहेत.. सासरमध्ये प्रज्ञाचे पती शिक्षण दहावी झालेले आहे तसेच ते प्लंबिंग क्षेत्रांमध्ये व्यवसाय करत आहे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहे. प्रज्ञाला घर कामांमध्ये प्रज्ञाची सासु देखील चांगल्या प्रकारे सहकार्य करते त्यामुळे प्रज्ञाला सासरच्या व्यक्तींकडून कुठल्याही प्रकारचा त्रास नाही ही प्रज्ञासाठी सकारात्मक बाब आहे
.
समस्या :-
प्रज्ञा ही बचत गटाच्या माध्यमातून महिलांबरोबर काम करत असे व वेगवेगळ्या महिलांच्या सामाजिक संघटनाची जोडली गेलेली होती. प्रज्ञाला कम्प्युटर क्षेत्रात काम करण्याची खूप आवड होती तसे तिचे (बी.कॉम )शिक्षणही झालेले होते. तिला योग्य संधी तसेच मार्गदर्शकाची गरज होती. प्रज्ञा ही सध्या बाहेरच्या व्यक्तींशी बोलताना घाबरते, बोलत नाही त्यामुळे तिला मानसिक दृष्ट्या आधाराची गरज असून त्यानंतर तिला या सर्व गोष्टींना बाहेर काढून समाजाबरोबर जोडण्याची देखील गरज आहे. या सर्व बाबी ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष भेटीतून आम्हाला समजून आले.त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट मनात ठेवत असे. हे सर्व आम्ही तिच्या निरीक्षणातून समजून घेतले त्यानंतर तिला विश्वासात घेऊन तिची ही समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्रज्ञासमोर सर्वप्रथम आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे हा विषय खूप महत्त्वाचा होता हा विषय आम्ही मार्गी लावणे व याला प्राथमिकता देणे ठरवले.
हस्तक्षेप : –
ज्यावेळी तपोवन रोड येथे आम्ही समुदाय संघटन करण्यासाठी गेलो त्यावेळी प्रज्ञा देखील या ठिकाणी उपस्थित राहिली व तिने युथ फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या विविध अपारंपारिक उपजीविका प्रशिक्षणाची माहिती घेतली व तिने उत्स्फूर्तपणे आपला प्रतिसाद नोंदवला. सर्वप्रथम आम्ही प्रज्ञाच्या घरी जाऊन प्रज्ञाच्या सासू तसेच त्यांच्या पतीशी चर्चा केली. कौटुंबिक वातावरण खूपच आनंदाचे आणि सकारात्मक असल्याने आम्हाला हस्तक्षेप करण्यासाठी कुठलाही अडथळा आला नाही. आम्ही कुटुंबाला अजून कसं सक्षम करता येईल यासाठी प्रज्ञाला कम्प्युटर क्षेत्रामध्ये टॅली अकाउंटिंग हा कोर्स निवडण्याचा सल्ला दिला. अशाप्रकारे सर्वप्रथम प्रज्ञाने जीवन कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करून त्यानंतर तिच्या आवडीनुसार तसेच तिच्या शिक्षणाच्या आधारावर तिने टॅली आणि अकाउंटिंग हा कोर्स निवडून तो प्रामाणिकपणे यशस्वीरित्या पूर्ण केला.
व्यक्तिगत बदलाव :-
जीवन कौशल्य प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ज्यावेळी अभिप्राय नोंदवण्यासाठी प्रज्ञा आपले मनोगत व्यक्त करू लागली त्यावेळेस तिच्यामध्ये वेगळाच आत्मविश्वास जागृत झालेला आम्हास निरीक्षणात आला. प्रज्ञा योग्य संवाद कसा करावा तसेच आपल्या रागावर नियंत्रण कसे करावे आपल्या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे कुटुंबाबरोबर समाजाबरोबर जगत असताना आपण तणावाची व्यवस्थापन कसे करावे अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रज्ञा खूप सहजपणे सर्वांशी चर्चा करू लागली. आम्हाला मनोमन या गोष्टीचा आनंद झाला की आमच्यामुळे प्रज्ञा (लाभार्थी) आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवत आहे व आर्थिक दृष्ट्या अजूनच सक्षम होऊन आपले जीवन समृद्ध करत आहे.

( प्रज्ञा यादी मॉल येथे अकाउंटिंग क्षेत्रात काम करत असतानाचा एक प्रसंग…)
सामाजिक बदल : –
प्रज्ञा आधी जनरल स्टोअर मध्ये काम करत होती परंतु प्रज्ञाचे शिक्षण पाहून तिने टॅली अकाउंटिंग हा कोर्स निवडला व तो यशस्वीरित्या पूर्ण करून प्रज्ञा आता एका चांगल्या मॉलमध्ये काम करत आहे . पूर्वी प्रज्ञा जनरल स्टोअर मध्ये एक मदतनीस म्हणून काम करत होते परंतु आज तिचे टॅली आणि अकाउंटिंग क्षेत्रात प्रशिक्षण करून तेथील मॉल मालकाने तिच्यावर संपूर्ण मॉलची जबाबदारी दिलेली आहे. मॉल मालकाचा तिच्यावरील विश्वास अजूनच दृढ झालेला आहे. तसेच पूर्वीपेक्षा पगार देखील वाढवून दिलेला आहे. तिथे अकाउंटंट क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे आपले कर्तृत्व दाखवत आहे ही एक आपल्या फाउंडेशन साठी एक अभिमानाची बाब आहे. सध्या प्रज्ञाला यादी मॉल या नोकरीच्या ठिकाणी बारा हजार रुपये इतक्या पगारावर काम करत आहे. हळूहळू पुढे चालू करण्याचा पगार देखील वाढणार आहे.त्यामुळे प्रज्ञाच्या आर्थिक परिस्थितीला देखील हातभार लागणार आहे. सध्या प्रज्ञा खूप छान संवाद करून ग्राहकांशी मिळून मिसळून बोलत आहे व कामाच्या ठिकाणी देखील प्रज्ञाचा संवाद प्रज्ञाची नाते सगळ्यांशी मिळून मिसळून आहे. प्रज्ञा सध्या खूप संघर्ष जीवन परंतु आनंदी जीवन जगत आहे.प्रज्ञाच्या हाताला तिच्या आवडीचे काम असल्यामुळे तिला या संघर्षात देखील आनंद वाटत आहे. ही आपल्या सामाजिक संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे ती एक महिला आपले घर सांभाळून बाहेर देखील काम करत आहे व फक्त काम करून थांबत नाही तर ती आपली कुटुंब पुढे कसे जाईल मुलांचे शिक्षण चांगले कसे होईल यासाठी तिचा प्रयत्न आहे.
शाश्वत बदल :-
प्रज्ञा मुळातच कष्टाळू आणि जिद्दी असल्याने तसेच प्रत्यक्षेत्रात काहीतरी नवीन शिकण्याची आवड असल्यामुळे आपण तिला वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. प्रत्येक महिन्याला तिला नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पगार होतो का ? तसेच तिच्या वैयक्तिक जीवनामध्ये तिला कुठल्या बाबीसाठी आपला सल्ला हवा आहे या संदर्भात देखील आपण कायमस्वरूपी प्रज्ञाचा पाठपुरावा करणार आहोत. प्रज्ञाला पुढील शिक्षणासाठी देखील आपण चांगल्या प्रकारचे कॉलेज सुचवून तिची शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. विविध शासकीय योजनांचा प्रज्ञाला जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल व प्रज्ञा फक्त स्वतःचच जीवन समृद्ध करून येथेच थांबणार नाही तिथे तिच्याबरोबर इतर महिलांना देखील पुढे आणण्यासाठी एक आदर्श महिला घडवण्यामध्ये प्रज्ञा बरोबर असणार आहोत.